Monday, November 26, 2018

आशेचा किरण

शीखांचे पहिले धर्मगुरु गुरु नानक साहिब य़ांनी त्यांच्या जीवनातील शेवटची अठरा वर्षे जेथे घालविली ते पाकिस्तानातील करतारपूर अचानक प्रकाशझाेतात आले. शीखांसाठी अत्यंत पवित्र असलेली ही पावन भूमी फाळणीनंतर भारतापासून वेगऴी झाली. भौगोलिक सीमेने करतारपूर सीमेपलिकडे गेले असले तरी जगभरातील बारा कोटी शीख बांधवांच्या ह्रदयात ही भूमी कायम वास करीत असते. शीख धर्माचा उदय झाल्यानंतर धर्माचा प्रसार-प्रचार करण्यासाठी ऩानक अनुयायी करतारपूर येथूनच बाहेर पडले. जगातील पहिला लंगरही येथेच साजरा झाला. गुरु नानक साहिब यांनी आपला देह येथेच ठेवला. आणि येथेच गुरुव्दारा उभा राहिला. भारतातून वाहत जाणाऱया रावी नदीच्या किनारी हा गुरुव्दारा उभा आहे. 
भारत अखंड असतांना डेरा बाबा नानक आणि कर्तारपूर येथे शीख बांधवांची वर्दळ असायची. फाळणीनंतर परिस्थितीत बदल झाला. पवित्र कर्तारपूर पाकिस्तानच्या वाटयाला गेले. धर्माच्या आधारावर झालेल्या भारताच्या फाळणीने केवळ मनेच तुटली नाहीत तर संस्कृती,आचार-विचार,नाती,विश्वास यांचीही ताटातूट झाली. धर्माच्या आधारावर पंजाबचे दाेन तुकडे झाले तरी या प्रांताचे नाव मात्र कायम राहिले. समृध्दीने नटलेला आणि वैभवशाली असलेला हा प्रदेश रावी,चिनाब,झेलम,सतलज,बियास या नदयांनी सुजलाम,सुफलाम केला आहे. या पाच नदयांवरुनच या भूमीचे नाव पंजाब पडले. पंज म्हणजे पाच आणि आब म्हणजे पाणी. 

27 जुले 2015
 2 जानेवारी 2016



Saturday, July 1, 2017




Tuesday, February 14, 2017






Wednesday, January 4, 2017

राजकारणातील धर्मशृंखला

अनिल यादव 
राष्ट्राच्या व्यावहारिक जीवनात ज्यावेळी अतार्किक धर्माचा प्रवेश होतो तेव्हा त्या राष्ट्राचे सामाजिक जीवन गढूळ झाल्याची शेकडो उदाहरणे इतिहासाच्या पोतडीत बंदिस्त आहेत. खरे तर धर्म म्हणजे नक्की काय, याचे उत्तर अजूनही कुणाला सापडले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, धर्म हा शब्द निश्‍चित-अर्थ-दुर्लभ आणि व्याख्याविहीन आहे. धर्म या संकल्पनेची वेगवेगळी अवस्थांतरे झाली आहेत. ही संकल्पना कधीच स्थिर नव्हती. परिस्थितीनुसार धर्माला आकार दिला आणि अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार न करता सोयीस्कर अर्थ लावला गेला आहे. हाच धर्म जेव्हा राजकारणात घुसतो तेव्हा त्याचे समाजजीवनावर विपरीत परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. अगदी 18 व्या शतकातीलच दाखला घ्या. मोहम्मदशहा हा बादशहा असताना 1725 च्या एप्रिल महिन्यात शाही दफ्तरखान्यातील कारकून रामजी हा मुसलमान झाला. त्याक्षया पत्नी आणि मुलीने मात्र धर्म बदलण्यास नकार दिला. प्रकरण शाही काजीकडे गेले. मुलगी वयात आली नसल्याने तिच्यावर धर्मांतर करण्यास बळजबरी करता येणार नाही, असा निकाल दिला आणि सुरक्षेसाठी तिला जीवनदास नावाच्या कापडविक्रेत्याकडे सोपविले. हा निकाल धर्मांधांना आवडला नाही. निर्णयानंतर आलेल्या शुक्रवारी खुतबा झाल्यानंतर काही पुंडांनी दंगल सुरू केली. अनेकांची बळजबरीने सुंता केली. प्रकरण अंगलट येत असल्याने बादशहाने त्या मुलीला तुरुंगात डांबले. धर्मांच्या आड येणाऱ्या त्या बिचाऱ्या निष्पाप मुलीला कोठडीत ठार मारले. तिचा दफनविधी केल्यानंतरच दंगेखोर शांत झाले. एवढेच नव्हे तर बादशहा मोहम्मदशहाने "काफिरां'वर पुन्हा जिझिया कर लावला. भूतकाळातील खपल्या काढण्याचा उद्देश एवढाच की, राजकारणात धर्माची लुडबूड सुरू झाल्यास त्याचे दुष्परिणाम निष्पापांच्या वाट्याला येतात.
निकोप आणि सर्वसमावेशक धर्म तोच ज्यात द्वंद्वात्मकता आणि द्वंद्वन्यायाला स्थान मिळते. तसे न झाल्यास संबंधित धर्माच्या अधिष्ठानाला धक्का लागून तो लयाकडे सरकतो. धर्म हा शिकण्यासाठी नव्हे तर तो जगण्यासाठी असला पाहिजे. जगातील अनेक भागांत आज जी स्फोटक स्थिती आहे ती द्वंद्वात्मकतेला नाकारण्याच्या प्रवृत्तीमुळेच. जे राज्यकर्ते धर्माला राजकारणात घुसखोरी करण्यापासून रोखू शकले त्या देशांनी प्रगतीचे शिखर गाठले आहे. आजमितीला जगात जे दहा शक्तिशाली देश आहेत त्यापैकी एकाही देशात राजकारणात धर्माला स्थान नाही.
पाकिस्तानची निर्मिती ही केवळ धर्माच्या आधारावर झाली. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले तर पाकिस्तान इस्लामी. आज धर्माच्या नावावर पाकमध्ये दररोज कुठे ना कुठे रक्त वाहत आहे. काश्‍मिरातील दहशतवादालाही धर्माचीच किनार. तालिबानने तर अफगानिस्तानची वाताहत केली. सिरिया, इराकमध्ये अबू बक्र अल बगदादीने तर क्रौर्याचा खेळच मांडला. त्याचे ध्येयसुद्धा उम्माह म्हणजेच धर्माधिष्ठित राष्ट्रनिर्मितीचे आहे.
म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवरील जीवघेणे हल्ले हासुद्धा धार्मिक उन्माद होय. धर्माला तोंडी लावण्याच्या घटना भारतीय राजकारणातही घडल्या. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळातील शहाबानो प्रकरण हे धार्मिक लांगूलचालनाचे समर्पक उदाहरण होय. भारतातील सामाजिक एकतेला सुरुंग लावण्याचे काम शहाबानो प्रकरणाने केले तर बाबरी पतनाच्या घटनेने हिंदू-मुस्लिमांच्या मनात तेढ निर्माण करून ठेवली. कुणी मान्य करो अथवा न करो; नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या 282 जागा मिळाल्या त्यामागे काहीअंशी धार्मिक कारणे आहेतच.
खरे तर राष्ट्राला धर्मच नसतो. असलाच तर तो नीती, तत्त्वज्ञान, तर्क, व्यावहारिकता, सर्वसमावेशकता या तत्त्वांचा पुरस्कार करणारा असावा. ही सर्व तत्त्वे एकाच धर्मात आढळतात आणि तो म्हणजे बौद्ध धर्म. म्हणूनच भारताचा जर कोणता राष्ट्रीय धर्म असेल तर तो म्हणजे बौद्ध धर्म; परंतु धर्म कितीही प्रगल्भ, व्यापक असला तरी त्या धर्माचे अनुयायी तो आचरणात आणतीलच असे नाही. आचरणाअभावी धर्माचे अस्तित्व शून्यवत ठरते. म्हणूनच धर्म हा तर्कशुद्ध शक्‍यताशक्‍यतेवर आधारित असला पाहिजे. तो प्रवाही आणि लवचिक आणि चिकित्सेला वाव असणारा असावा. धर्म जीवनव्यवहार असून त्याची राजकारणात घुसळण नकोच. प्रचलित काळाला अनुरूप असावा. कालचक्रातून धर्माचीही सुटका नाही. काळाच्या गतीचे विश्‍लेषण करताना प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, काळ हा असा इल्मी जादूगार आहे की, आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून त्या वस्तूला, स्थितीला आणि कल्पनेलासुद्धा उलटीपालटी करू शकतो. 

Sunday, March 1, 2015

पानिपत : मराठ्यांचे राष्ट्रीयत्व, शौर्याचे प्रतीक

- अनिल यादव
बुधवार, 14 जानेवारी 2015
१४ जानेवारी १७६१ रोजी संक्रांतीला पानिपतावर महासमर होऊन अडीचशे वर्षे झाली तरी आजही महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या स्मृतीत पानिपतचे मैदान कायम आहे. खरे तर पानिपतावर महाराष्ट्र विरुद्ध अफगाणिस्तान असे युद्ध झाले. कारण, या युद्धात केवळ महाराष्ट्रातील रांगडे, शूर मराठेच लढले. त्यांच्या शौर्याने, हौतात्म्याने महाराष्ट्राचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर झाले.

जगात अशी काही युद्धे लढल्या गेली, ज्यामुळे त्या-त्या देशातील सामाजिक, भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीत मोठी उलथापालथ झाली. दिल्लीपासून ९० किलोमीटरवर असलेल्या पानिपतावर झालेल्या तीन युद्धांनी भारताचा सर्व इतिहासच बदलून टाकला. पहिल्या महायुद्धाने हिंदुस्थानात मुघल राजवटीचा उदय झाला. 

दुसऱ्या युद्धात अकबराने हेमू या हिंदू राजाची हत्या करून बादशाही बळकट केली, तर तिसऱ्या आणि विध्वंसक ठरलेल्या तिसऱ्या युद्धाने महाराष्ट्रधर्माला, मराठाशाहीला जगाच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले. पाश्‍चिमात्य इतिहासकारांनी पानिपतावरील मराठ्यांच्या राष्ट्रीयत्वाला, पराक्रमाला मुजरा केला. विचारवंत आणि इतिहासकार इव्हॅन्स बेल लिहितात की, मराठे हे ‘हिंदी लोकांसाठी हिंदुस्थान’ या ध्येयाने आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेने लढले. त्यामुळे पानिपतची लढाई मराठ्यांना अभिमानास्पद आणि कीर्ती मिळवून देणारी घटना आहे. प्राचार्य रॉलिन्सन मराठ्यांचा पराक्रम आणि क्षात्रतेजाने भारून गेले. ते लिहितात, इतिहासातील एखादा पराजय हा विजयाइतकाच सन्मान देणारा ठरतो. मराठ्यांच्या सर्व इतिहासात त्यांच्या फौजेने राष्ट्रातील सर्व उत्तम शिलेदारांसह पानिपतच्या घनघोर रणक्षेत्रात आपल्या देशाच्या आणि धर्माच्या वैऱ्यांशी लढताना जे मरण पत्करले, त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्‍वचितच नोंदले गेले असेल.

परदेशी इतिहासकार पानिपतावरील मराठा पराक्रमाचे गोडवे गात असताना दुर्दैवाने काही भारतीय लेखक आणि इतिहासकार पानिपत हे मराठे आणि महाराष्ट्रावरील कलंक आणि अपयश असल्याचे मानतात. वास्तविक पाहता दिल्लीत मुसलमानी राजवट असताना शेकडो मैल दूर असलेल्या पुण्यावरून मराठा लष्कराला पानिपतावर जाण्याची मुळीच गरज नव्हती. खरे तर दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मुघलांची हुजरेगिरी, गुलामगिरी करणारे, त्यांच्या बाजूने लढणारे तत्कालीन राजपूत, जाट, मुस्लिम संस्थानिक, राजेरजवाड्यांची होती. दिल्लीच्या इभ्रतीचे रक्षण करण्यासाठी आलेल्या मराठ्यांना मदत न करता बिळात लपून बसणाऱ्या वर उल्लेखित सर्वांसाठी पानिपत हे कलंक आहे. या भूमीचे अन्न खाल्लेला, तिच्यावर पोसला गेलेला रोहिलखंडचा नजीब खान, अवधचा  नबाब शुजाउद्दोला यांनी मराठ्यांच्या राष्ट्रधर्माची बाजू न घेता आपल्या धर्माची तळी उचलून धरत देशाशी बेइमानी केली. त्यामुळे पानिपतचा कलंक हा मराठ्यांवर नव्हे, तर या सर्व बेइमानांवर आहे. पानिपतावर मराठे प्राणाची आहुती देत असताना महाराष्ट्र वगळता उर्वरित हिंदुस्थानातील तथाकथित ‘पराक्रमी’ राजे-महाराजे, संस्थानिक गंमत पाहत होते. धर्माने मुसलमान असलेल्या दिल्लीच्या बादशहाचे राज्य शाबूत ठेवण्यासाठी लाखभर मराठ्यांनी मैदानावर जिवाची जी होळी खेळली, त्याला देशाच्या इतिहासात तोड नाही. 

अफगाणिस्तानचा शासक अहमदशहा अब्दाली, भारतातील बेइमान नजीबखान रोहिला आणि अवधचा नबाब शुजाउद्दोला यांनी हे युद्ध धर्मासाठी लढले. परंतु, मराठ्यांनी देशासाठी युद्ध केले. कारण, मराठ्यांचे लष्कर हे अठरापगड जातींचे होते. त्यात मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, हबशी यांच्यासह महाराष्ट्रातील बारा बलुतेदार शिपाई सहभागी झाले होते. भगवा झेंड्याच्या रक्षणासाठी मुस्लिम असलेल्या इब्राहिम खान गारद्याने धर्मासाठी नव्हे, तर राष्ट्रकार्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. सदाशिवराव भाऊने तर पानिपतावर अभिमन्यूप्रमाणे लढताना अतुलनीय पराक्रम गाजविला. त्यांच्या शौर्याला तोड नाही. अनेक सरदार त्यांना रणांगण सोडण्याचे सल्ले देत असताना भाऊने देशकार्यासाठी मरण पत्करणे पसंत केले. शहाण्णवकुळी मराठ्यातील असे एकही घराणे नव्हते की, ज्याने पानिपतावर तलवार गाजविली नाही. शिंदे घराण्याच्या अख्ख्या एका पिढीनेच पानिपतावर हौतात्म्य पत्करले. या युद्धाचे  नेतृत्व अनुभवी दत्ताजी शिंदे अथवा मल्हारराव होळकर यांच्याकडे असते तर युद्धाचा निर्णय वेगळा लागला असता. अर्थात, राजकारण आणि धर्मकारण करताना मराठ्यांनी धर्मभेद केल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे पानिपतचे युद्ध मराठ्यांवरील कलंक असल्याचे संबोधणे हे इतिहास घडविणाऱ्या मराठ्यांवर अन्याय केल्यासारखे होईल. 

हिंदुस्थानच्या इतिहासातून शिवराय, महाराष्ट्र आणि मराठे वगळल्यास केवळ पराजयच आणि पराजयच दिसतो. म्हणूनच अठरापगड जातींच्या समूहातून तयार झालेला मराठा आणि मराठाधर्माने सतरावे आणि अठरावे शतक आपल्या पराक्रमाने गाजविले. पानिपतच्या युद्धानंतर मराठे संपले नाहीत, तर यापुढे त्यांनी दिल्लीचा कारभार आपल्या हातात घेतला. म्हणूनच इंग्रजांनी दिल्लीची सत्ता मुघल, राजपूत, शीख, जाट या शासकांशी लढून नव्हे, तर मराठ्यांशी लढून घेतली.



Free Blog Templates